top of page

आमचे ध्येय

ई-लक्षणे हा आमचा जीवन-आवश्यक वैद्यकीय माहिती उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.

 - कोणीही, कुठूनपण ही माहिती, फुकटात पाहू शकतात,
 - ती सुद्धा आपल्या भाषेतुन, कळायला सोप्या, चित्रातून, आणि
 - आपल्या कुटुंबा आणि मित्रां बरोबर मोबाइलवर वाटू शकता.

सार्स विषाणु
डास प्रसारित
पशु प्रसारित
About
भारतातील सर्वात व्यापक रोग

क्षयरोग

एचआयव्ही

हात स्वच्छता

सामाजिक स्वच्छता

आम्ही

ई-लक्षणे हा प्रकल्प दोन दहावीच्या विद्याथिनींनी (उमा कामत आणि अलका कामत) त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत चालू केला.  पुण्याच्या प्रसिद्ध डॉक्टर भ. सिं. रता यांनी त्यांना वैद्यकीय मार्गदर्श्नन आणि प्रोहत्सान दिले. आम्ही भारतातील पुण्यनगरी मध्ये हा प्रकल्प २०१७ मध्ये चालू केला.

सोशल मीडियाद्वारे सर्वसामान्य लोकांसाठी वैद्यकीय माहिती फुकटात उपलब्ध करणे, हे आमचे ध्येय आहे!

इतक्या वैद्यकीय माहिती साइट्स असताना, हि नवीन कशाला?

CDC, NIH आणि WHO सारख्या साइटस वैद्यकीय माहितीसाठी सर्वोत्तम आहेत. आम्हाला असे जाणवले की या साईट्स वैद्यकीय व्यावसायिका साठी  चांगल्या आहेत. पण सामान्य व्यक्तीसाठी ह्या साईट्स खूपच कठीण आहेत. आपल्याला जेव्हा रोंगाची माहिती हवी असते, तेव्हा ती पटकन, सोप्या आणि आपल्या भाषेत हवी असते. 

अशाप्रकारे, आम्ही मेडकार्डचा शोध लावला. मेडकार्डस रोगाचे त्वरित संदर्भ आहेत, जे लक्षणे, प्रतिबंध आणि सर्वसाधारण माहिती प्रदान करतात. ह्या अशा प्रतिमा आहेत ज्या सहजपणे विविध सामाजिक मीडियावर वाटू शकतात. मोबाइलवर लोकां पर्यंत काही क्षणात पोहोचउ शकतात.  

हि माहिती त्वरित संदर्भ म्हणून वापरली पाहिजे.  व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्यासाठी पर्यायी नाही.

 

म्हणून कृपया योग्य उपचारांसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आम्ही प्रतिबंधात्मक माहिती प्रदान केली आहे,  आणि कोणत्याही उपचारांची माहिती नाही प्रदान केली.

Contact
Contact Us!

Success! Message received.

Subscribe
bottom of page